Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

ई हक्क (PDE) मधूनच फेरफार नोंदविणेची खेड , मुळशी व उरण या तालुक्यात टेस्टिंग करणे बाबत

 विषय –  हक्क (PDEमधूनच फेरफार नोंदविणेची  खेड , मुळशी  उरण  

       या तालुक्यात टेस्टिंग करणे बाबत

 

                   कोणत्याही नागरिकाला तलाठी कार्यालयाकडे फेरफारासाठी करवयाचे अर्ज ऑनलाईन दाखल करण्यासाठी ई-हक्क प्रणाली (PDE) सुरु असून तिचा वापर राज्यभरात करण्यात येत आहे. आता तलाठी कार्यालयात नागरिकांनी प्रत्यक्ष दाखल केलेले अर्ज देखील ई-फेरफार प्रणालीतील फेरफार नोंदविण्यासाठी डेटा एन्ट्री ई- हक्क प्रणालीतून करता येतील अशी सुविधा विकसित केली असून त्यामध्ये खालील आठ प्रकारचे फेरफार नोंदविण्याचे कामकाज तलाठी यांना ई-हक्क प्रनालीतूनच करता येईल.

1. वारस

2. बोजा चढविणे

3. बोजा कमी करणे

4. इकरार

5. मयताचे नाव कमी करणे

6. ए.क्यु.मॅ. नोंद कमी करणे

 7.अ.पा.क शेरा कमी करणे

 8. विश्वताचे नाव बदलणे

 

             या पुढे ही प्रणाली लागू केल्यानंतर वरील आठ प्रकारचे फेरफारांची नोंदणी ई फेरफार मधून न होता फक्त ई हक्क मधूनच होईल . त्यासाठी आज दिनांक ९.४.२०२१ पासून हे टेस्टिंग करण्याचे काम खेड व मुळशी जि. पुणे आणि उरण जि. रायगड या तालुक्यातील सर्व तलाठी यांना वरील आठ फेरफार नोंदविण्यासाठी

ही लिंक वापरावी.

 

सदरचे सर्व प्रकारचे पाच / पाच फेरफार नोंदवून त्याचा वापरकर्ता तपासणी अहवाल आठ दिवसांत इकडे पाठवावा. या बाबत काही अडचणी येत असल्यास त्या सविस्तरपणे नमूद करून आपला आहवाल जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे पाठवावा ही विनंती

टेस्टिंग साठी काही मदत लागल्यास हेल्पडेस्क ची मदत घ्यावी

 

आपला विश्वासू

 

श्री रामदास जगताप

राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प

जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे

दिनांक ९.५.२०२१

Post a Comment

0 Comments