Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

PM KISAN YOJANA: लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव नसेल तर येथे तक्रार करा

 PM KISAN YOJANA: लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव नसेल तर येथे तक्रार करा


पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकारने शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपये (DMT) च्या साह्याने इलेक्ट्रॉनिक पेमेंट केले आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी दरमहा सहा हजाराच्या तीन टप्यात त्यांच्या खात्यात पैसे वर्ग करत आहे. जर तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थी आहात परंतु आतापर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत किंवा नोंदणीनंतरही तुमचे नाव यादीमध्ये येत नसेल तर तुम्ही कॉल करून का येत नाही ह्या बद्दल माहिती घेवु शकता.

 

प्रथम आपले खाते या प्रमाणे तपासा

- प्रथम पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या मुळ संकेतस्थळ https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

- येथे तुम्हाला उजव्या बाजूला 'फार्मर्स कॉर्नर' हा पर्याय मिळेल

- येथे 'लाभार्थी  स्थिती' पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पान (TAB) उघडेल.

- नवीन पृष्ठावर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबर पैकी एक निवडा.

- आपण निवडलेल्या पर्यायाची संख्या भरा. यानंतर, गेट डेटा वर क्लिक करा.

- येथे क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल. म्हणजेच तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाले.

- आपल्याला सहाव्या हप्त्याशी संबंधित माहिती देखील मिळेल.

- जर तुम्हाला 'FTO is generated and Payment confirmation is pending’  असे दिसले तर याचा अर्थ असा आहे की पैसे ट्रान्सफर ची  प्रक्रिया सुरू झाली आहे. हा हप्ता आपल्या खात्यात काही दिवसांत ट्रान्सफर केला जाईल.

 


पंतप्रधान किसान योजनेंतर्गत पैसे आले नसल्यास येथे तक्रार करा

 

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत किंवा यादीत नाव न भरल्यास आपण त्याबद्दल तक्रार करून माहिती घेऊ शकता. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या हेल्पलाइनवर संपर्क साधा (पंतप्रधान-किसान हेल्पलाईन 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) याव्यतिरिक्त आपण मंत्रालयाच्या अन्य 011-23381092 वर देखील कॉल करू शकता.


Post a Comment

0 Comments