महिना निहाय चलन तयार करण्याची सुविधा
![]() |
| तलाठी लॉगिन ला DDM मध्ये महिना निहाय चलन तयार करण्याची सुविधा देण्यात आली आहे |
नमस्कार मित्रांनो.
आत्ताच आलेल्या माहितीवरुन अभिलेख वितरण प्रणालीतील (डीडीएम) वितरित अभिलेखांची नक्कल फी शासन जमा करण्यासाठी मार्च 2020 पासून बँक ऑफ बडोदा चा VAN नंबर द्वारे केली जात आहे. जर एका महिन्याची नक्कल फी जमा केली नसेल तर सदारची रक्कम पुढील महिन्याच्या चालना मध्ये समाविष्ट केली जात होती परंतु त्यामध्ये येणार्या अडचणी विचारात घेवून दिनांक. 12.10.2020 पासून महिना निहाय चलन तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे तरी प्रत्येक तलाठी यांनी महिना निहाय चलन तयार करून ज्या महिन्याचे चलन यापूर्वी भरले नाही ह्याची खात्री करूनच त्या महिन्याचे चलना प्रमाणे ऑनलाइन किंवा बँकेत रोख रक्कम जमा करावी. कोणत्याही तालुक्यातील सर्व साझे यांची संपूर्ण रक्कम जमा झाल्या शिवाय तलाठी सझा व महसूल मंडळ पुनर्रचना आदेशा प्रमाणे साझा फोड किंवा नवीन साझा निर्मिती करता येणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प
दिनांक 14.10.2020

0 Comments