1) अहवाल (3) व अहवाल (3अ) म्हणजे, 7/12 व आकारबंदामधील फरक असतो. सदर अहवाल दुरुस्ती कामी आकारबंद जवळ असणे आवश्यक आहे.
2) आकारबंदामधील दुरुस्ती करीता ओडीसी आज्ञावली वापरावी व 7/12 मधील दुरुस्ती करीता ईफेरफार मधील 155 दुरुस्ती सुविधा, खाते दुरुस्ती सुविधा व चुक दुरुस्ती सुविधा वापरावी.
3) आकारबंदामधील दुरुस्ती करीता ओडीसी आज्ञावली मध्ये लॉगिन करुन अहवाल 3 व 3अ ओपन करावेत.
4) ओडीसी आज्ञावली मध्ये अहवाल 3 ओपन केलेनंतर, सर्व्हे क्र नुसार अहवाल 3 मध्ये, अहवाल मधील प्रलंबीत असलेला ग.न. टाकावा, त्यामध्ये दोन रकाने दिसतील 1) गाव नमुना १ मधील सर्व्हे क्रमांक व 2) गाव नमुना ७ मधील सर्व्हे क्रमांक. सदर रकान्या मध्ये ग.न. चा आकारबंद व 7/12 मध्ये काय फरक आहे तो कळेल. सदर माहीती ही आर चौ मी मध्ये दिसेल परंतु दुरुस्ती करतांना हे आर मध्ये दुरुस्ती करायची आहे. सदर अहवाल हा पिवळ्या रंगामध्ये दिसेल.
5) नंतर अहवाल 3 दुरुस्ती मध्ये जावे, व त्यामध्ये अहवाल 3 व 3अ मधील प्रलंबीत ग.न. दिसतील त्यामध्ये दुरुस्ती करावी, दुरुस्तीला ग.न. उपलब्ध नसलेस नविन मध्ये जाऊन सर्व्हे क्र नव्याने भरुन संबंधीत ग.न. विषयी माहीती भरावी.
6) प्रलंबीत अहवाल मध्ये माहीती ही आर चौ. मी. मध्ये दिसेल परंतु दुरुस्ती करतांना ती हे. आर. मध्ये दुरुस्त करायची आहे.
7) दुरुस्ती करतांना आकारबंदाप्रमाणे भुधारणा पध्दती, क्षेत्र, पो.ख., आकारणी ही सर्व माहीती हे.आर मध्ये भरायची आहे.
8) दुरुस्ती केले नंतर माहीती साठवा करायची आहे व त्यानंतर तहसिलदार अथवा डिबीए यांची मान्यता घ्यायची आहे.
9) मान्यता घेतलेनंतर प्रलंबीत अहवाल चा रंग पिवळा मधुन हिरवा झाला तर आपला त्या ग.न चा अहवाल निरंक झाला असेल.

0 Comments