चूक दुरुस्ती व खाता दुरुस्ती दरम्यान घेतलेल्या फेरफार व मंजूर फेरफाराचा योग्य अंमल झाला असल्याची खात्री करूनच अभिलेख वितरीत (DDM प्रणाली) करण्याबाबत
![]() |
| चुक दुरुस्ती व खाता दुरुस्ती दरम्यान घेतलेल्या फेरफार व मंजुर फेऱफाराचा योग्य अंमल झाला असल्याची Khatri करुनच अभिलेख वितरीत करण्याबाबत. |
ई फेरफार प्रणालीमध्ये काम करताना सुरवातीच्या काळामध्ये जेव्हा खाता दुरुस्ती फेरफार व चूक दुरुस्ती फेरफार हा सर्वांना उपलब्ध करून देण्यात आला होता त्यावेळेस सदर दुरुस्ती पूर्ण झाल्याशिवाय म्हणजेच तो फेरफार प्रमाणित झाल्याशिवाय इतर कोणताही फेरफार नोंदवणे अपेक्षित नव्हते परंतु काही गावांमध्ये असे न करता खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक दुरुस्ती फेरफार अपूर्ण ठेऊन दुसरे फेरफार नोंदवले गेले व असे फेरफार प्रमाणित पण केले गेले. तदनंतर सुरवातीस घेतलेला खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक दुरुस्ती फेरफार हा तहसीलदार यांच्या मान्यतेने नोंदवून मंडळ अधिकारी यांच्या द्वारे प्रमाणित झाला त्यामुळे खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक
दुरुस्ती फेरफारनोंदवून मंडळ अधिकारी यांच्या द्वारे प्रमाणित करण्याच्या कालावधी मध्ये जे
अन्य फेरफार प्रमाणित झाले होते त्यांचे अंमल नष्ट होवून (फक्त असे फेरफार ज्या मध्ये त्याच नावां संबंधी दुरुस्त्या दोन्ही फेरफारां मध्ये घेण्यात आल्या ) या नोंदी दिसेनास्या झाल्या व खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक दुरुस्ती फेरफार नोंद प्रमाणित झाल्याचा अंमल ७/१२ वर दिसू लागला. हि बाब जेव्हा निदर्शनास आली तेंव्हा ई फेरफार प्रणाली मधे खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक
दुरुस्ती फेरफार नोंदऊन मंडळ अधिकारी यांच्या द्वारे प्रमाणित होई पर्यंत दुसरा कोणताही फेरफार प्रमाणित होऊ न देण्यासाठी उपाय योजना केली गेली. परंतु दरम्यानच्या काळामधे असे जे फेरफार
प्रमाणित झाले व तदनंतर ज्यांचे अंमल दिसेनासे झालेल्या अशा सर्वे क्रमांकावर त्या नोंदी पुनः प्रस्थापित करण्यासाठी खाता दुरुस्ती / चूक दुरुस्ती फेरफार घेऊन सदर नोंदी पूर्ववत करता येतील. या बाबत सविस्तर सूचना मार्गदर्शक सूचना क्र.१७७ दिनांक २०.८.२०२० अन्वये देण्यात आल्या आहेत त्यांचे अवलोकन व्हावे.
याचा निर्णय ७/१२ व फेरफार रजिस्टर पाहून घ्यावा लागेल. या मध्ये फक्त अशाच नोंदींना समस्या आल्या ज्या मध्ये खाता अथवा चूक दुरुस्ती चे फेरफारामध्ये ज्या नावांची दुरुस्ती प्रमाणित न करता त्याच नावं संबंधी फेरफार पुढील फेरफारामध्ये घेण्यात आले. इतर नावाचे फेरफारांना कोणताही प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळे अशा नोंदींचे सर्व्हे क्रमांक संभाव्य त्रुटी
म्हणून दाखवण्यात येत आहेत. आपणास ७/१२ उचित आहे हे बघण्याची सोय व निर्णय
(७/१२ कन्फर्म करणे अथवा चूक दुरुस्ती वा खाता दुरुस्ती फेरफार घेऊन सदर त्रुटी दूर करणे) घेणेसाठीची सोय खाली नमूद वेबसाईटवर दिली आहे अशा वेळेस खाता दुरुस्ती फेरफार अथवा चूक दुरुस्ती फेरफार जो दरम्यानच्या फेरफारानंतर प्रमाणित केल्यामुळे
( त्या खाता / नावा संबंधी)नष्ट झालेल्या नोंदीचा अंमल पुन्हा चूक दुरुस्ती / खाता दुरुस्ती ने घेणे किंवा कसे ? याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.
दुरुस्ती फेरफार घेण्यासाठी खाली नमूद साईट वापरावी.
या साठीचे मार्गदर्शिका सोबत जोडली आहे.
वेब साईट लिंक : https://mahaferfarnas.enlightcloud.com/cdkdcm/
तथापि अशी खात्री करून दुरुस्ती होईपर्यंत असे ७/१२ अभिलेख वितरण प्रणालीतून (DDM) वितरीत करू नयेत. ही अत्यंत महत्वाची सूचना आपल्या अधिनस्त सर्व तलाठी मंडळ अधिकारी व तहसीलदार यांचे निदर्शनास आणावी ही विनंती. सोबत तालुका निहाय घेनेत आलेल्या चूकदुरुस्ती व खाता दुरुस्तीचे फेरफारांची एकूण संख्या दिली
आहे.

0 Comments