Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

फेरफार नोंदी डिजिटल स्वाक्षरीत करण्यापुर्वी घ्यावयाची काळजी

 


फेरफार प्रणालीमध्ये ऑनलाईन फेरफार घेवून निर्गत करण्याची सुरुवात राज्यभरात सन २०१५-१६ पासून झाली आहे   आज अखेर सुमारे एक कोटी पेक्षा जास्त फेरफार ऑनलाईन पद्धतीने निर्गत करण्यात आले असून संदर्भीय शासन निर्णयान्वये डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, खाते उतारे आणि फेरफार उतारे सामान्य जनतेला ऑनलाईन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्याप्रमाणे डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ आणि   जनतेला ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जात आहेत ताठापे डिजिटल स्वाक्षरीत फेरफार देखील सामान्य नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी  फेरफार प्रकल्पा अंतर्गत फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचीबाब विचाराधिन होती.

   आज दिनांक १९.११.२०२० पासून राज्यातील सर्व तलाठी यांना DSD प्रणाली अंतर्गत यापूर्वी प्रमाणित/ निर्गत केलेले फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

 या सुविधेतून निर्गत फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करताना खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

 1    1)  फेरफार प्रणालीतून निर्गत झालेले सर्व फेरफार तलाठी यांचे लॉगीनने DSD module च्या नियमित लिंकवरून  डिजिटल स्वाक्षरीत करण्यापूर्वी तो फेरफार ओपन करून त्यातील सर्व तपशील योग्य  बरोबर असल्याचे तसेच मंडळ अधिकारी यांचा फेरफार  निर्गतीचा शेरा नमूद असल्याची खात्री करावी.

     2)ज्या फेरफार मधील तपशील अपूर्ण / चुकीचा असेल किंवा मंडळ अधिकारी शेरा नमूद नसेल असे फेरफार रजिस्टर तहसीलदार यांचे कलम १५५ च्या आदेशाने परिपूर्ण करूनच असे  फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करण्यात यावेत.

      3) कोणताही फेरफार डिजिटल स्वाक्षरीत केल्या नंतर तो   योग्यरीत्या डिजिटल स्वाक्षरीत झाला असल्याची खात्री करावी.


आजुन हे पण वाचा-

Post a Comment

0 Comments